नागपूर- कामाला गेलेल्या चिमुकल्या मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना कोंढाळी जळील घुबडी शिवारात घडली आहे. भाग्यश्री येडमे आणि अर्चिता मंगाम असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
धक्कादायक; शेतात कामासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा तळ्यात बुडून मृत्यू - शेतात कामासाठी गेलेल्या मुलींचा मृत्यू
दोन चिमुकल्या मुली आज घुबडी शिवारात कामाला गेल्या होत्या. दुपारची सुट्टी झाल्यानंतर इतर मुलींसह त्या सुद्धा शेत तळ्यात पोहत होत्या. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भाग्यश्री ( वय १२ वर्षे ) अर्चिता ( वय ११ वर्षे ) या दोन्ही चिमुकल्या आज दुपारी घुबडी गावातील सेवकरम परतेती यांच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. दुपारी कामाची सुट्टी झाल्यावर इतर मुलींसोबत शेततळ्यात त्या देखील पोहत होत्या.
पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत फार उशीर झाला होता. कोंढाली पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.