नागपूर - कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे शहरातील एक रुग्णालय आणि दोन डायगनोस्टिक सेंटर बंद करण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे.
नागपुरातील एका रुग्णालयासह दोन डायगनोस्टिक सेंटर बंद - नागपुरातील एका रुग्णालयासह दोन डायगनोस्टीक सेंटर बंद
कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे शहरातील एक रुग्णालय आणि दोन डायगनोस्टिक सेंटर बंद करण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे.
![नागपुरातील एका रुग्णालयासह दोन डायगनोस्टिक सेंटर बंद विक्की कुकरेजा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6621008-574-6621008-1585743748734.jpg)
नागपुरातील जरीपटका येथील जनता रुग्णालय, रामदासपेठ येथील रेनबो मेडिनोवा डायगनोस्टिक सेंटर यासह रामदासपेठ येथील पेनोरमा एम. आय. आर सेंटर येथे शहरातील काही कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. यासंदर्भात माहिती मिळताच मनपाच्या आरोग्य विभागातर्फे एक रुग्णालय आणि दोन डायगनोस्टिक सेंटरचे निर्जंतुकीकरण करून ते बंद करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून तीनही खासगी रुग्णालये बंद करण्यात आले असून शासनाच्या पुढील दिशानिर्देशानुसार कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य सभापती विक्की कुकरेजा यांनी स्पष्ट केले.