महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात फेसबूक लाईव्हच्या नादात भीषण अपघात; कार उलटल्याने दोन भावांचा मृत्यू - नागपूर

ओव्हरटेक करण्याच्या नादात कार पलटल्याने पुंकेश आणि संकेत पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या दोन भावांची नावे आहेत.

दोन भावांचा मृत्यू

By

Published : Jun 17, 2019, 9:51 AM IST

Updated : Jun 17, 2019, 11:59 AM IST

नागपूर- फेसबुक लाईव्ह करताना कार चालवणे दोन भावांच्या जीवावर बेतल्याची घटना नागपुरात घडली. ओव्हरटेक करण्याच्या नादात कार पलटल्याने पुंकेश आणि संकेत पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या दोन भावांची नावे आहेत. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली.

नागपुरात फेसबूक लाईव्हच्या नादात भीषण अपघात

नागपुरातील काही तरुण झायलो कारने पार्टी करण्यासाठी काटोलच्या दिशेने जात होते. त्यातील एका तरुणाने फेसबूक लाईव्ह सुरू केले होते. फेसबुकवर लाईव्ह सुरू असल्याचे बघून चालकालासुद्धा जोश चढला होता. दरम्यान, या तरुणांनी वेगाशी स्पर्धा करताना त्यांनी अनेक गाड्यांना मागे टाकले होते. काटोल मार्गावरील हातला शिवाराजवळ गाडी आल्यावर गाड्यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे झायलो कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडीने अनेक पलट्या घेत झाडाला जाऊन आदळली.

या अपघातामध्ये दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अपघात होईपर्यंत या घटनेचे फेसबूक लाईव्ह सुरूच होते आणि फेसबुकवर लाईव्ह पाहणारे मित्र त्यांना एन्जॉय करण्याचा सल्ला देत होते. त्यामुळे अपघात कसा झाला याचे सर्व चित्रीकरण झाले आहे.

या अपघातात पुंकेश व संकेत पाटील या दोन भावांचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर काटोल व नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Last Updated : Jun 17, 2019, 11:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details