नागपूर - नागपुर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील नंदा गोमुख आणि छत्रपुर येथील वाहन वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 6 पैकी पाच जणांचे मृतदेह मिळून आले आहेत. मंगळवारी (दि.12 जुलै)रोजी घडलेल्या घटनेनंतर काही तासात तीन मृतदेह मिळून आले होते. पण आणखी तिघांचा शोध सुरू होता. ( Kolar Lake ) आज बुधवार (13 जुलै)रोजी सकाळपासून इंडिआरएफच्या पथकाने शोध मोहीम राबवली. त्यामध्ये सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास तीन मृतदेह मिळाले आहेत.
गुरुवारी सकाळपासून मृतदेह शोधण्याचे काम सुरू - मिळून आलेल्या मृतदेहात दहा वर्षीय बालक दर्श चौककीकर, दुसरा मृतदेह निमू आठणेर (वय 43) वर्षीय महिलेचा मृतदेह मिळून आला आहे. तर (वय 38 वर्षे) कारचा चालक लीलाधर हिवरे याचा मृतदेह आणखीही मृतदेह सापडलेला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले जाणार आहे. अशी माहिती शोध पथकाने दिली आहे.
सायंकाळी दोन मृतदेह मिळाले - आज सकाळापासूनच या शोधमोहिमेला केळवद पोलिसांच्या बंदोबस्तात शोध मोहीम राबविण्यात आली. यात एनडीआरएफचे जवळपास 25 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते. या पथकाने परिसरातील कोलार तलावाचा पूर्ण भाग शोधून काढला आहे. सायंकाळ होता-होता दोन मृतदेह मिळाले आहेत.