नागपूर- जिल्ह्याच्या सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी उलटून अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सावनेर-पांढुर्णा मार्गावर चारचाकी उलटून दोघांचा मृत्यू, ७ जखमी - सावनेर
सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकीचा अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त वाहन
सर्वजण सावनेर येथील कापसाच्या जिनिंगमध्ये कामासाठी जात होते. चारचाकी वाहन छत्रापून शिवारात चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ती चारचाकी चार वेळा उलटली. मारोतराव सरयाम व विनोद भीमराव राऊत (दोघे रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींवर सावनेर येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून सर्वांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांनी लपवले फौजदारी गुन्हे, नागपूर न्यायलयाने बजावली नोटीस