नागपूर - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपुरात दोन दिवसांची टाळेबंदी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त असल्याचे पहायला मिळत आहे. ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारून चौकशी सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले आहे.
टाळेबंदीला नागपूरकरांचा उत्तम प्रतिसाद - पोलीस आयुक्त - nagpur lockdown news
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपुरात दोन दिवासांची टाळेबादी करण्यात आली आहे. याला नागपूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली आहे.
टाळेंदीच्या पार्श्वभूमीवर शहरात तगडा पोलीस बंदोबस्त पहायला मिळत आहे. शहरातील ठिकठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक असेल त्यांनाच ओळखपत्र तपासणी करुन सोडले जात आहे. दरम्यान, टाळेबंदीच्या अनुशंगाने संपूर्ण शहरात 150 पेक्षा अधिक चेकपोस्ट आणि 175 वाहनांद्वारे गस्त घातले जात असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. या टाळेबंदीला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नाही. नागपूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण लवकरच कोरोनाची साखळी तोडू. मात्र, विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चोप दिला जात असल्याचेही आयुक्त उपाध्याय यांनी सांगितले.
टाळेबंदीच्या काळात पोलीस कर्मचारी सकाळी 6 वाजल्यापासून रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे आहेत. ते फक्त नागरिकांच्या सुरक्षेसाठीच उभे आहेत. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करावे व टाळेबंदीचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी पोलीस आयुक्तांनी केले आहे.