नागपूर- शनिवार आणि रविवारी नागपुरात जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. जनतेने जर स्वतःहून कोरोनाबाबतचे नियम पाळले तर नागपूरकरांवर पुन्हा लॉकडाऊन आणि कडक कर्फ्यू लावण्याची वेळ येणार नसल्याची प्रतिक्रिया शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी दिली.
लाॅकडाऊन नको असेल तर कर्फ्यूचे नियम पाळा... अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे आवाहन - nagpur curfew news
मनपा आयुक्तांनी लॉकडाऊन नव्हे तर कर्फ्यू लावला जाईल आणि तो ही १५ दिवस राहील, असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन न करता शिस्तीचे पालन करुन काही कठोर उपाययोजना करता येईल का, यासंदर्भात सर्वांचे एकमत झाल्याने शनिवारी आणि रविवारी नागपूर शहरात कडक जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर निलेश भरणे यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शहराच्या विविध भागांचा दौरा सुरू केला आहे. नागरिकांनी जनता कर्फ्यूचे पालन काटकोरपणे करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात लॉकडाऊन संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू होती. मनपा आयुक्तांनी लॉकडाऊन नव्हे तर कर्फ्यू लावला जाईल आणि तो ही १५ दिवस राहील, असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन न करता शिस्तीचे पालन करुन काही कठोर उपाययोजना करता येईल का, यासंदर्भात सर्वांचे एकमत झाल्याने शनिवारी आणि रविवारी नागपूर शहरात कडक जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.