महाराष्ट्र

maharashtra

शेकोटीमुळे घराला लागलेल्या आगीत दोघ लहान मुलांचा होरपळून मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 11:05 PM IST

Nagpur Fire News : नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सेमिनरी हिल परिसरात एका घराला रात्री दहा वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.

Nagpur Fire News
आग

नागपूर Nagpur Fire News : नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सेमिनरी हिल परिसरात एका घराला रात्री दहा वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन लहान मुलांचा भाजल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सेमिनरी हिल भागात व्हेटर्नरी कॉलेजमागे गोविंद गोरखेडे कॉम्प्लेक्स आहे,त्या शेजारी नांदे कुटुंबाच घर आहे. रात्री दहा वाजल्याच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागली या आगीत दोन लहान मुलांचा भाजल्याने मृत्यू झालाय. देवांश आणि प्रभास उईके अशी मृतक मुलांची नावं आहेत. तर एक मुलगी थोडक्यात वाचली आहे,यामध्ये पाळीव श्वान देखील मृत झाला आहे.



थंडी असल्याने मुलांनी घरातचं शेकोटी पेटवली होती, ज्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातं आहे. ज्यावेळी आग लागली त्या वेळी घरात देवांश,प्रभास आणि त्यांची मोठी बहीण होते तर आईवडील हे कामाला गेलेले होते. आग लागल्यानंतर देवांश आणि प्रभास हे दोघे घरात अडकून पडले होते, तर त्यांची मोठी बहीण जीव वाचवून घरा बाहेर पडली. तिने आरडाओरडा सुरू केल्यानंतर स्थानिक लोक मदतीसाठी पुढे आले. मात्र,तोपर्यंत दोघांचा भाजल्याने मृत्यू झाला होता. ज्यावेळी घराला आग लागली त्यावेळी घरात दोन सिलेंडर होते माझं सुदैवानं त्यांच्यापर्यंत आग पोहोचण्यापूर्वी अग्निशमन विभागाच्या पथकाने आग वीजवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

हेही वाचा -

  1. नागपूरच्या 'पेपर बोर्ड कंपनी'ला भीषण आग, नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू
  2. मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून राख
  3. विको कंपनीतील आग भडकण्याचे कारण म्हणजे वॅक्स अन् अल्कोहोल, कंपनीचे ७० टक्के नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details