नागपूर -नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस स्टेशन ( Kapil Nagar Police Station ) हद्दीतील भंगारच्या दुकानातून पाच लाख रुपये किंमतीचे जुने वापरलेले मात्र, रिमोल्डिंगसाठी आलेले टायर चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक ( police arrested Two who stole the tires ) केली आहे. मोहम्मद शहजाद मोहम्मद राईस शेख, अब्दुल नदीम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावं आहे. त्यांच्याकडून पाच लाख किमतीत टायर जप्त करण्यात आले आहेत.
Tire Theft : जुने वापरलेले टायर चोरणाऱ्यां दोघांना अटक, पाच लाखांचे टायर जप्त - Tire Theft
नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस स्टेशन ( Kapil Nagar Police Station ) हद्दीतील भंगारच्या दुकानातून पाच लाख रुपये किंमतीचे जुने वापरलेले मात्र, रिमोल्डिंगसाठी आलेले टायर चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक ( police arrested Two who stole the tires ) केली आहे. मोहम्मद शहजाद मोहम्मद राईस शेख, अब्दुल नदीम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावं आहे.
पाच लाख किमतीचे टायर जप्त -आरोपी मोहम्मद शहजाद मोहम्मद राईस शेख, अब्दुल नदीम यांनी चोरी करण्यापूर्वी रेकी केली होती. त्यानंतर त्यांनी नियोजनबद्ध पध्दतीने शेकडो टायर लंपास केले. याबाबत दुकान मालकाला समजले असता त्याने थेट कपिल नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू केला असता मोहम्मद शहजाद मोहम्मद राईस शेख, अब्दुल नदीम हे दोन आरोपी चोरीच्या टायरसह त्यांच्या हाती लागले आहेत.
चोरीच्या टायरची विक्री -आरोपींनी रिमोल्डिंगसाठी आलेले शेकडो टायर लंपास केले होते. कार,ट्रक,ट्रेलर आणि मोठ्या वाहनांच्या टायरचा समावेश होता. आरोपी हे चोरलेले टायर विकण्याच्या तयारी आहेत अशी माहिती समाजल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.