महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून गोळी झाडल्यानंतरही त्याचा जीव वाचला; नागपुरातील प्रकार

आरोपी दीपकने थेट तो देशी कट्टा सुबोधवर रोखल्याने काही क्षण महेंद्र नगरचा तो परिसर स्तब्ध झाला होता. कुणाला काही कळण्यापूर्वीच आरोपीने सुबोधवर नेम धरत बंदुकीतून गोळी झाडली. मात्र ती गोळी बंदुकीच्या आताच अडकून पडल्याने अनर्थ टळला.

पाचपावली पोलीस
पाचपावली पोलीस

By

Published : May 25, 2021, 7:19 PM IST

Updated : May 25, 2021, 7:29 PM IST

नागपूर - 'देव तारी त्या कोण मारी' ही म्हण नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र नगरामधील लोकांनी प्रत्यक्षात अनुभवली आहे. सुबोध शशिकांत वासनिक याला जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने दीपक गौर आणि संजय नाईक या दोन गुंडांनी डोक्यावर बंदूक रोखली, कुठलाही विचार न करता क्षणात आरोपींनी बंदुकीतून गोळी झाडली देखील, मात्र दैव बलवत्तर होत म्हणून ती गोळी बंदुकीच्या आताच अडकून पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने सुबोध वासनिक यांना जीवनदान मिळाले आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून दीपक गौर आणि संजय नाईक या गुंडांना अटक केली आहे.

पाचपावली पोलीस

असा घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार सुबोध वासनिक हे भाजी विक्रेते आहेत. त्यांचा लहान भाऊ दीपक गौर आणि संजय नाईक आरोपींच्या संगतीला लागला होता. सुबोध वारंवार आपल्या भावाला हटकत असल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यानंतर त्यांनी सुबोधची वाट अडवून त्याच्याकडे जाब विचारला, त्यावेळी त्यांच्यात चांगलाच वादविवाद झाला. त्याच वेळी दीपकने घरी जाऊन देशी कट्टा आणला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सारेच घाबरून गेले होते. आरोपी दीपकने थेट तो देशी कट्टा सुबोधवर रोखल्याने काही क्षण महेंद्र नगरचा तो परिसर स्तब्ध झाला होता. कुणाला काही कळण्यापूर्वीच आरोपीने सुबोधवर नेम धरत बंदुकीतून गोळी झाडली. मात्र ती गोळी बंदुकीच्या आताच अडकून पडल्याने अनर्थ टळला. त्यानंतर तक्रारदार सुबोध वासनिक यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात जाऊन दोन्ही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीकरुन पोलिसांनी दीपक गौर आणि संजय नाईक या दोन गुंडांना अटक केली आहे.

हेही वाचा-वहिनीचा खून करणाऱ्या दिराची पोलीस कोठडीत रवानगी; घटनेमागे प्रॉपर्टीचा वाद असल्याचा आरोप

Last Updated : May 25, 2021, 7:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details