नागपूर - कोरोनामुळे सर्वाधिक ताण हा आरोग्यसेवेशी संबंधित डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांवर आलेला आहे. अशात नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी घरोघरी जाऊन कोरोनासंदर्भांत सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सर्वांनी स्वतःची काळजी घेण्याचा प्रेमळ सल्ला त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्या, तुकाराम मुंढे यांचा प्रेमळ सल्ला - कोरोनाविरुद्धचा लढा
नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी घरोघरी जाऊन कोरोनासंदर्भांत सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सर्वांनी स्वतःची काळजी घेण्याचा प्रेमळ सल्ला त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला आहे.
तुकाराम मुंढे यांचा प्रेमळ सल्ला
३० लाख नागपूरकरांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:चीही काळजी घ्या, असा प्रेमळ सल्ला त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची ही भेट आकस्मिक होती. कोरोनाविरुद्धचा लढा लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याच्या हेतूने त्यांनी सर्वेक्षणासाठी जात असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये संवाद साधला.