महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Janatacurfew : अशीच इच्छाशक्ती 31 मार्चपर्यंत दाखवा - तुकाराम मुंढे - Tukaram Munde

शहरातील नागरिकांनी 'जनता कर्फ्यू'च्या निमित्ताने दृढ इच्छाशक्तीचा परिचय दिला आहे. असेच येत्या 31 मार्चपर्यंत हीच परिस्थिती कायम ठेवा, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Tukaram Munde
तुकाराम मुंढे

By

Published : Mar 22, 2020, 2:56 PM IST

नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरातील नागरिकांनी स्वतःहून 'जनता कर्फ्यू'मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आज दाखवलेली इच्छाशक्ती अशीच 31 मार्च पर्यंत दाखवण्याची गरज असल्याचे मत नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले आहे.

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे

हेही वाचा -नागपूर : मंत्री आणि आमदारांमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल

'जनता कर्फ्यू'च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे सकाळपासूनच शहरातील विविध भागांचा दौरा करत आहेत.

यावेळी माध्यमाशी बोलताना मुंढे म्हणाले, शहरातील नागरिकांनी 'जनता कर्फ्यू'च्या निमित्ताने दृढ इच्छाशक्तीचा परिचय दिला आहे. असेच येत्या 31 मार्चपर्यंत हीच परिस्थिती कायम ठेवा, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

हेही वाचा -'जनता कर्फ्यू' : नागपूर बंद, रेल्वे स्थानकावर तुरळक गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details