महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"मै चोर नही हूँ" असे अंगावर लिहून ट्रक चालकाची पोलीस स्टेशनसमोर आत्महत्या - नागपुरात ट्रक चालकाची आत्महत्या

चोरीच्या आरोपाखाली १४ जून च्या रात्री कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालक अशोक नागोत्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. ९ जून च्या रात्री अशोक नागोत्रा यांच्या ट्रकमधून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी शिवारातील बाजारगाव येथील पेट्रोल पंप जवळून तेलाचे पिंप चोरीला गेले होते. ट्रान्सपोर्ट मालकाने यासंदर्भात चोरीच्या घटनेच्या पाच दिवसानंतर म्हणजे 14 जून ला संध्याकाळी कोंढाळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

TRUCK DRIVER COMMITS SUICIDE BY HANGING HIMSELF IN FRONTS OF POLICE
"मै चोर नही हूँ" असे अंगावर लिहून ट्रक चालकांने केली आत्महत्या

By

Published : Jun 16, 2021, 12:27 PM IST

Updated : Jun 16, 2021, 1:21 PM IST

नागपूर -जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशन समोर मंगळवारी ट्रक चालकाने ट्रकच्या कॅबिनला तार बांधून गळफास घेतला होता. त्या ट्रक चालकाच्या हात आणि पायावर "मै चोर नही हूँ" असे लिहिलेले आढळले आहे. त्याच्या शवविच्छेदनादरम्यान ही बाबसमोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण -

चोरीच्या आरोपाखाली १४ जूनच्या रात्री कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालक अशोक नागोत्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. ९ जूनच्या रात्री अशोक नागोत्रा यांच्या ट्रकमधून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी शिवारातील बाजारगाव येथील पेट्रोल पंप जवळून तेलाचे पिंप चोरीला गेले होते. ट्रान्सपोर्ट मालकाने यासंदर्भात चोरीच्या घटनेच्या पाच दिवसानंतर म्हणजे 14 जून ला संध्याकाळी कोंढाळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्याविरोधात चोरीचा (अफरातफर) गुन्हा दाखल करत ट्रक पोलीस स्टेशनच्या समोर उभा केला होता. मात्र, काल सकाळी अशोक नागोत्रा पोलीस स्टेशन समोर पोलिसांनी आणून ठेवलेल्या त्यांच्याच ट्रकला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता रुग्णालयात पाठवला होता. शवविच्छेदन करताना त्यांच्या हातावर आणि पायावर मी चोर नाही असे लिहिलेले आढळून आले आहे. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणात नवे वळण आले आहे.

अशोक नागोत्रा यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार कोण -

ट्रकमधून तेलाचे पिंप चोरी गेल्याच्या पाच दिवसांनंतर ट्रान्सपोर्ट मालकाने या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्यावर अवास्तव दबाव आणला होता का, त्यांना कोणी मारहाण केली होती का, किंवा प्रामाणिक असूनही ट्रक मालक आणि पोलिसांनी त्यांच्यावर चोरीचा आरोप ठेवल्यामुळे नैराश्यात त्यांनी आत्महत्या केली आहे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - धक्कादायक! चोरीचा आरोप असलेल्या ट्रक चालकाने पोलीस स्टेशन समोरच ट्रकला गळफास घेत केली आत्महत्या

Last Updated : Jun 16, 2021, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details