नागपूर - येथील नागपूर-भंडारा मार्गावरील टेलिफिन एक्सचेंज चौकात बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या न्यू इरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अपघाताची ही घटना आज सकाळी घडली.
नागपूर-भंडारा मार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तर 6 जण जखमी - लकडगंज पोलीस घटना
नागपूरहून भंडाऱ्याच्या दिशेने खासगी बस निघाली होती. टेलिफोन एक्सचेंज चौकात बस आल्यावर रस्ता क्रॉस करणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.
नागपूरहून भंडाऱ्याच्या दिशेने खासगी बस निघाली होती. टेलिफोन एक्सचेंज चौकात बस आली असता एका ट्रकने बसला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की बसमधील एका प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर, 6 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या न्यू इरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच लकडगंज शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, स्थानिकांनी पोलीस येण्याआधीच मदतकार्य सुरू केले होते.