महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हुतात्मा भूषण सतई यांना कामठी गार्ड रेजिमेंट येथे मानवंदना

पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूरचे जवान सुपुत्र भूषण सतई यांना वीरमरण आले आहे. आज सकाळी गार्ड रेजिमेंटच्या मैदानावर भूषण सतई यांना मानवंदना देण्यात आली.

Shahid Bhushan Satai
शहिद भूषण सतई

By

Published : Nov 16, 2020, 10:29 AM IST

नागपूर -श्रीनगर येथे नायक भूषण सतई या जवानाला वीरमरण आले होते. भूषण हा मूळचा नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील रहिवासी आहे. काल रात्री हुतात्मा भूषणचं पार्थिव नागपूर येथे दाखल झाल्यानंतर ते रात्रभर कामठी येथील गार्ड रेजिमेंट येथे ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी गार्ड रेजिमेंटच्या मैदानावर भूषण सतई यांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी कामठी गार्ड रेजिमेंट येथील सैन्याचे मोठे अधिकारी आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर भूषण यांचे पार्थिव त्यांच्या मूळगाव असलेल्या काटोलकडे रवाना करण्यात आले. पार्थिव हे सैन्याच्या सजवलेल्या विशेष वाहनातून काटोलकडे निघाले.

भारताच्या ३ जवानांना वीरमरण -

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या ३ जवानांना वीरमरण आले होते. यातील २ जवान उरी सेक्टरमध्ये आणि एक जवान गुरेज सेक्टरमध्ये शहीद झाले. भारतानेदेखील प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा-नागपूरपुत्र भूषण सतई यांना वीरमरण; नितीन राऊत यांनी व्यक्त केल्या संवेदना

हेही वाचा-हुतात्मा ऋषिकेश जोंधळेंचे पार्थिव कोल्हापुरातील त्यांच्या मूळ गावी दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details