महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Gadkari on Twitter : नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात होणार शक्य, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची ट्विटरवरून माहिती - नागपूर ते पुणे आठ तासात प्रवास शक्य

राज्यात समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचे ( Travel from Nagpur to Mumbai )अंतर कमी झाले आहे. तसेच सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास ( Nagpur to Pune ) करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगर जवळ नवीन प्रस्तावित पुणे-संभाजीनगर एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे नी जोडण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Union Road Transport Minister Nitin Gadkari ) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत ही ( Nitin Gadkari on Twitter ) माहिती दिली आहे.

Nitin Gadkari on Twitter
नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात होणार

By

Published : Oct 30, 2022, 5:51 PM IST

नागपूर : राज्यात समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचे ( Travel from Nagpur to Mumbai )अंतर कमी झाले आहे. तसेच सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास ( Nagpur to Pune ) करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगर जवळ नवीन प्रस्तावित पुणे-संभाजीनगर एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे नी जोडण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Union Road Transport Minister Nitin Gadkari ) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत ही ( Nitin Gadkari on Twitter) माहिती दिली आहे.

नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात होणार शक्य, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची ट्विटरवरून माहिती

नागपूर ते पुणे आठ तासात प्रवास - नागपूर-पुणे द्रुतगती महामार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI) द्वारे तयार करण्यात येणार आहे. संपूर्ण नवीन अलाईंमेंट घेऊन हा महामार्ग तयार करण्यात येईल, यामुळे पुणे- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रवास अडीच तासांत आणि समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर-संभाजीनगर प्रवास साडेपाच तासांत करता ( Nagpur to Pune in eight hours ) येणे शक्य होणार आहे.


प्रस्तावित रस्त्याची लांबी 268 किमी -सध्याच्या पुणे-अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरील रस्ता संपर्क स्थानिक वाहतूक आणि औद्योगिक वाहतुकीमुळे ओव्हरलोड आहे. पुणे बंगलोर द्रुतगती महामार्ग ते नागपूर मुंबई समृद्धी द्रुतगती मार्ग औरंगाबाद येथे जोडतो, जो पुढे नागपूरला कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. प्रस्तावित रस्त्याची लांबी 268 किमी असून यामध्ये पुणे शहराभोवती प्रस्तावित रिंगरोडच्या 39 किमी लांबीचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details