महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची रुग्णालयातील लिपिकास मारहाण; कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास एक वैद्यकीय शिकाऊ विद्यार्थी त्याच्या आईसोबत रुग्णालयात नोंदणी करण्यासाठी आला. नोंदणीच्या वेळी विद्यार्थ्याचे लिपिक साबळे यांच्यासोबत वाद झाला. दुपारी १ च्या सुमारास वैद्यकीय विद्यार्थी आपल्या काही साथीदारांसह पुन्हा रुग्णालयात आला. त्यावेळी विद्यार्थी आणि लिपिक साबळे यांच्यात पून्हा वाद झाला. यावेळी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी फिर्यादी शरद साबळे यांना मारहाण केली व घटनास्थळावरून निघून गेले.

government hospital nagpur
मारहाण झालेल्या लिपिकाचे दृश्य

By

Published : Mar 3, 2020, 11:33 PM IST

नागपूर- शासकीय अति विशेषोपचार रुग्णालयाच्या लिपिकास रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण केल्याच्या विरोधात अति विशेषोपचार रुग्णालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आज दुपारपासून काम बंद आंदोलन केले आहे. कर्मचारी संघटनेने या घटनेच्या विरोधात नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यामध्ये प्रशिक्षू डॉक्टर विरुद्ध तक्रार दिली असून मारहाण करणाऱ्या डॉक्टर विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

प्राप्त माहितीनुसार, शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण नोंदणी विभागात शरद साबळे (वय.३०) हे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास एक वैद्यकीय शिकाऊ विद्यार्थी त्याच्या आईसोबत नोंदणी करण्यासाठी आला. नोंदणीच्या वेळी विद्यार्थ्याचे लिपिक साबळे यांच्यासोबत वाद झाला. त्यावेळी तो वैद्यकीय विद्यार्थी तेथून निघून गेला. मात्र, दुपारी १ च्या सुमारास तो इतर काही साथीदारांसह पुन्हा तिथे आला. त्यावेळी विद्यार्थी आणि लिपिक साबळे यांच्यात पून्हा वाद झाला. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी फिर्यादी शरद साबळे यांना मारहाण केली व घटनास्थळावरून निघून गेले.

कर्मचाऱ्यास डॉक्टरकडून मारहाण झाल्याची माहिती समजताच मेडिकल व अतिविशेषोपचार रुग्णलयातील कर्मचारी अधिष्ठाता कार्यालयात पोहचले व त्यांनी काम बंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी घटनेच्या निषेधार्थ व आरोपी डॉक्टर विरुद्ध कडक कारवाईची मागणी करीत शासकीय मेडिकल व अतिविशेषोपचार रुग्णालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी बुधवारी संप पुकारला आहे.

हेही वाचा-दारूसाठ्यासह ५ आरोपींना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details