नागपूर :आठ दिवसांपूर्वी नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहन बिऱ्हाडे नामक तरुणाची हत्या (Roham Birhade Murder Case) झाली होती. हत्या प्रकरणात पोलिसांनी बाबू बकरी उर्फ वीरेंद्र रामगडिया, अश्विन उर्फ गुड इंदूरकर आणि येशुदास उर्फ शँकी परमार या तीन आरोपींना पोलिसांनी अटक (three accused arrested in murder case) केली होती. त्यापैकी एका आरोपीचा व्हिडीओ वायरल होत आहे. ज्यामध्ये तो आज जेल, कल बेल आणि त्यानंतर तोच जुना खेळ असे म्हणताना व्हिडीओमध्ये (today Jail tomorrow bell viral Video) दिसून येत आहे. एवढंच नाही तर जेलमधून बाहेर आल्यानंतर 50 लाखांची टीप मिळणार असल्याचा संवाद या व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. Roham Birhade massacre Nagpur, Latest news from Nagpur, Nagpur crime, Video viral Nagpur murder accused
अच्छीचा तो व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल -13 नोव्हेंबरच्या मध्यरात्री उशिरा पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्करीबाग येथे रोहन शंकर बिहाडे (२२) नामक तरुणाची तिघांनी मिळून हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच बाबू बकरी उर्फ वीरेंद्र रामगडिया, अश्विन उर्फ गुड इंदूरकर आणि येशुदास उर्फ शँकी परमार या तीन आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या तिघांना न्यायालयात हजर केले त्यावेळी आरोपींचे काही साथीदार देखील तिथे भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी एकाने अश्विन उर्फ अच्छी त्याचा आवडता डायलॉग बोलला. तेव्हा त्याच्या साथीदाराने तो डायलॉग मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉड केला आणि वायरल केला आहे. हा व्हिडीओ इतका वेगात वायरल झाला की, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.