नागपूर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ( Maharashtra assembly winter session) प्रचंड वादळी होण्याचे स्पष्ट संकेत विरोधकांनी दिले आहेत. नागपूरला दरवर्षी होणारे हिवाळी अधिवेशन कोरोनामुळे गेली दोन वर्षे होऊ शकले नाही. जवळपास तीन वर्षांनंतर नागपूरला हिवाळी अधिवेशन होत आहे.या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस ( Assembly session second day ), या अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्यांसह राज्यासमोरील प्रश्नांवर, विकासाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या अडचणी सोडवल्या जाव्यात, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक बांधवांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकासाला गती देणारे निर्णय अधिवेशनाच्या माध्यमातून व्हावेत, अशी भूमिका विरोधीपक्षांनी घेतली आहे. ( Opposition boycott tea in Winter session).
उद्धव ठाकरे राहणार हिवाळी अधिवेशनाला उपस्थित :महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार उद्धव ठाकरे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. शिवसेना ( Uddhav Balasaheb Thackeray ) गटाचे प्रमुख ठाकरे हे मुंबईत झालेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी झाले नव्हते. उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.
असा होता अधिवेशनाचा पहिला दिवस : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार आंदोलने ( Assembly Winter Session ) झाली. विधिमंडळात बेळगाव कर्नाटक येथे राज्यातील जनतेवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात मुद्दा उपस्थित करण्यात आला त्याचवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना दरवर्षी केल्या जाणाऱ्या आंदोलनापासून यंदा दूर ठेवण्यात आले. त्यांचा आंदोलनाचा अधिकार काढून घेण्यात आला. त्याचप्रमाणे आमदार हसन मुश्रीफ आणि अन्य कार्यकर्त्यांना बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी सरकारच्या नर्माईच्या भूमिकेवर हल्ला चढवत कठोर भूमिका घ्यावी आणि कर्नाटकला धडा शिकवावा अशी मागणी केली.
आजच्या दिवसात अधिवेशनात असा असणार कामकाजाचा क्रम :सन २०१४-२०१५ या वर्षाचा नागरी स्थानक स्वराज्य संस्थांच्या लेखयांवरील लेखापरीक्षण पुनर्ववलोकन अहवाल मुख्यमंत्री सभागृहासमोर ठेवतील. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी याांचा सन २०२१-२०२२ या वर्षाचा वार्षिक अहवाल उप मुख्यमंत्री सभागृहासमोर ठेवतील. महाराष्ट्र पिु व मत्सस्य नवज्ञान नवद्यापीठ, नागपूर यांचा सन २०२१-२०२२ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंर्डळ मयानित, नवी मुंबई यांचा सन २०२०-२०२१ या वर्षाचा एकोणपन्नासावा वार्वर्षक अहवाल वस्त्त्रोद्योग मंत्री सभागृहासमोर ठेवतील. सर्व मंत्री आज ही कागदपत्रे सभाग्रहाच्या पटलावर ठेवतील. नियम ९३ अन्वये सूचना, लक्षवेधी सूचना, वनयम २६० अन्वये प्रस्ताव बैठकीचा शेवट होईल.