महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री करा, आशिष देशमुख यांची भाजपकडे मागणी

आमदार आणि मंत्री पदापेक्षा जास्त महत्त्व बावनकुळे यांना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री वारंवार म्हणायचे, तर मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावावी, अशी अजब मागणी देशमुख यांनी भाजपकडे केली आहे.

काँग्रेस नेते आशिष देशमुख

By

Published : Oct 28, 2019, 7:50 PM IST

नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे यांचे योग्य पुनर्वसन करणार असल्याचे आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांनाच मुख्यमंत्री करावे, असा अजब सल्ला काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर आघाडीने निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून समोर आणले असते, तर निवडणुकीच्या निकालाचे चित्र वेगळे बघायला मिळाले असते, असा दावाही त्यांनी केला. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री करा, आशिष देशमुख यांची भाजपकडे मागणी

हेही वाचा - 'साहेबांचं कार्य लई मोठ्ठं.. साऱ्या महाराष्ट्राच्या मनातला रणझुंजार नेता'

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघात काँग्रेसकडून आशिष देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. फडणवीस यांनी आशिष देशमुख यांचा 49 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला आहे. 2014 मध्ये फडणवीस यांच्या विजयाची लीड 58 हजारांची होती. या निवडणुकीत ही लीड 9 हजारांनी कमी झाली असल्याने फडणवीस जरी जिंकले असले तरी मुख्यमंत्री म्हणून ते हरले असल्याची टीकाही देशमुख यांनी केली.

हेही वाचा -भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार? अमित शाह बुधवारी राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता

निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्या योग्य पुनर्वसन संदर्भात अनेक आश्वासन दिले आहेत. आमदार आणि मंत्री पदापेक्षा जास्त बावनकुळे यांना महत्त्व मिळणार असल्याचे मुख्यमंत्री वारंवार म्हणायचे, तर मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावावी, अशी अजब मागणी देशमुख यांनी भाजपकडे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details