महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रामटेकच्या गड मंदिराच्या कळसावर जाळला टिपूर, परंपरा जाणून घ्या - त्रिपुरी पौर्णिमा यात्रा

त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने रात्री बारा वाजता रामटेकच्या गड मंदिराच्या कळसावर जाळला टिपूर जाळण्यात आला (tipur burn on summit on temple of ramtek) आहे. शेकडी वर्षांपासून ही परंपरा आजही तशीच सुरू (tipur burn on occasion of Tripuri Poornima) आहे.

Tripuri Poornima
रामटेकच्या गड मंदिराच्या कळसावर जाळला टिपूर

By

Published : Nov 13, 2022, 7:29 PM IST

नागपूर :त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने रात्री बारा वाजता रामटेकच्या गड मंदिराच्या कळसावर जाळला टिपूर जाळण्यात आला (tipur burn on summit on temple of ramtek) आहे. यावेळी रामटेक, नागपूरसह विदर्भ आणि शेजारच्या राज्यातील हजारो भाविक रामटेक गड मंदिरात उपस्थित झाले होते. त्रिपुरीपौर्णिमा रामटेक येथे अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची परंपरा (tipur burn on occasion of Tripuri Poornima) आहे.

रामटेकच्या गड मंदिराच्या कळसावर जाळला टिपूर

विजय मिळवल्याचे स्मरण :देवाला वर्षभर परिधान केलेले वस्त्र तुपात भिजवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर ती वस्त्रे राम मंदिर आणि लक्ष्मण मंदिराच्या कळसावर जाळण्यात आली. धार्मिक मान्यतेनुसार त्रिपुरासुरावर भगवान शंकराने विजय मिळवल्याचे स्मरण म्हणून रामटेक येथील श्रीराम-लक्ष्मण मंदिरावर 'टिपूर' जाळण्यात येतो. शेकडी वर्षांपासून ही परंपरा आजही तशीच सुरू (Tripuri Poornima know the tradition) आहे.


टिपूर जाळणे म्हणजे काय :भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता. त्या दिवसाचे स्मरण चिरंतन राहावे, यासाठी ही यात्रा भरवली जाते. देवांचे जीर्ण झालेले वस्त्र त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुपात भिजवून ठेवली जातात. त्यानंतर बरोबर मध्यरात्री 12 वाजता राम मंदिर आणि लक्ष्मण मंदिराच्या कळसावर ती जीर्ण वस्रे जाळली जातात. याला टिपूर जाळणे असे म्हणणे (temple of ramtek) जाते.



गड मंदिराचा इतिहास : रामटेकच्या प्रसिद्ध रामगिरी टेकडीवर 12 व्या शतकात यादव राजा रामदेवराय यांनी श्रीराम-जानकी व लक्ष्मणाची मंदिरे बांधली होती. पूर्वी येथे पाद्यपूजा होत असे. रघुजीराजे भोसले यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार करून मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर या मंदिरात विविध उत्सव साजरे करण्यात येऊ लागले. तीच परंपरा अद्याप गडमंदिरावर सुरू आहे. गडमंदिरावर दोन मोठ्या यात्रा भरतात. एक रामनवमीला तर दुसरी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा यात्रा (Tripuri Poornima) होय.

ABOUT THE AUTHOR

...view details