नागपूर - वनविभागाने अवनी वाघिणीची शिकार केल्यानंतर तिच्या बछड्यांचा सांभाळ आणि प्रशिक्षण देण्याचे काम वनविभागाकडून करण्यात येत होते. तब्बल दोन वर्ष प्रशिक्षिण दिल्यानंतर अवनीच्या मादी बछड्याला(PTRF-84) जंगलात सोडण्यात आले होते. मात्र, जंगलात सोडल्यानंतर तीन दिवसातच झालेल्या झुंजीमध्ये ती गंभीर जखमी झाली होती. त्या जखमी बछड्याचा आज अखेर सात दिवसाच्या उपचारानंतर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत वन विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
अवनीच्या मादी बछड्याचा मृत्यू, अवनी वाघीण मरण पावल्यानंतर 10 महिन्याच्या मादी बछड्या शिकारीचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मादी बछड्याला ५ मार्चला जंगलाच्या अधिवासात मुक्त करण्यात आले होते. यावेळी तिच्या लक्ष ठेवण्यासाठी तिला कॉलरआयडीही बसवण्यात आला होता. जंगलात सोडल्यानंतर लगेच 8 मार्चला तिची एका दुसऱ्या वाघिणीशी झुंज झाली. यात अवनीचा बछडा जखमी झाला. त्यामुळे वनविभागाने तत्काळ तिला जेरंबद करून परत सुरक्षित पिंजऱ्यात आणण्यात आले. आणि तिच्या उपचार सुरू कऱण्यात आले होते.
पुढच्या उजव्या पायाला झाली होती जखम....
जंगलात झालेल्या झुंजीमध्ये अवनीच्या मादी बछड्याच्या उजव्या बाजूच्या पुढच्या पायाला जखम झाली होती. त्यामुळे शिकार करण्यात अडचणी येत होत्या. वन विभागाच्या वतीने नजर ठेवून होते. त्रितलमांगी येथे तिच्यावर बंदिस्त पिंजऱ्यात पशुवैद्यकांच्या वतीने शर्थीचे उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सायंकाळी मादी बछड्याची तब्येत खालावली. त्यामुळे तिला गोरेवाडा येथे नेण्याच्या निर्णय घेण्यात आला. सर्व तयारी झाली असताना रात्री १० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रवीकिरण गोवेकर यांनी दिली.
अवनीच्या मादी बछड्याचा मृत्यू, पेंच प्रकल्पात दिले जात होते प्रशिक्षण-
पांढरकवडा येथील अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पात प्रशिक्षण दिले जात होते. सुमारे दोन वर्षे तित्रलमांगी येथील पाच हेक्टर बंदिस्त अधिवासात राहिल्यानंतर मादी बछड्याला खुल्या जंगलात सोडण्यात आले. जंगलाच्या अधिवासात रुळणे हे तिच्यासाठी एक प्रकारचे आव्हानच होते. त्याचाच प्रत्यय तीन दिवसातच आला. जंगलातील इतर वाघिणींशी संघर्ष होण्याची शक्यताही गृहित धरण्यात आली होती. या मादी बछड्याला सोडल्यापासून त्यावर वन विभाग रेडिओ कॉलरच्या माध्यमातून लक्ष ठेवून होते. जंगलात ८ मार्चला सकाळी या बछड्याची दुसऱ्या वाघिणीशी झडप झाली त्यात अवनीच्या बछड्याचा जंगलातील अधिवासाचा अनुभव कमी पडला आणि ती जखमी झाली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला बेशुद्ध केले आणि तेथून आणून तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रयत्नाला अपयश आले आणि अवनीचा बछडा मृत्यूमुखी पडला.