नागपूर - जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील पवनी कऱ्हाडला अभयारण्यातील कुही परिक्षेत्रातील वनखंड क्रमांक ३६५ मध्ये एका वाघाचा मृतदेह आढळून आला होता. वन विभागाचे कर्मचारी नियमित गस्तीवर असताना वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. आज सकाळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या प्रमाणभूत कार्य पद्धतीने शवविच्छेदन करण्यात आले
दोन वाघांच्या लढाईत एकाचा मृत्यू!
पवनी कऱ्हाडला अभयारण्यात टी-१७ वाघिणीच्या तीन छाव्यापैकी एक छावा मृतावस्थेत आढळून आला. त्याचे वन विभागाच्या टीमने शवविच्छेदन केले असता दोन वाघांच्या लढाईत हा ठार झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दोन वाघांच्या लढाईत एकाचा मृत्यू!
मृत झालेला वाघ हा टी-१७ या वाघिणीच्या ३ छाव्या पैकी एक आहे. तो दोन वर्षांचा अवयस्क नर वाघ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शवविच्छेदन दरम्यान अंगावर आढळलेल्या जखमांच्या खाणाखुणा आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या अनुषंगाने सदर वाघाचा मृत्यू हा आपसातल्या लढाईमुळे झाला असावा असे प्रथमदर्शनी अंदाज बांधण्यात आला आहे.