नागपूर- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडतानाचा वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वन्यजीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जंगलातून हा महामार्ग गेल्याने प्राण्यांचा जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा समोर आहे आले.
राष्ट्रीय महामार्ग ओलांडतांनाचा वाघाचा व्हिडिओ व्हायरल, वन्यजीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - महामार्ग
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडतानाचा वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वन्यजीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या व्हिडिओतून वण्यजिव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी जे दावे शासनाकडून केली गेले होते, ते फोल असल्याचे दिसून येत आहे.
रस्ता किव्हा रेल्वेचे रूळ ओलांडताना विदर्भात आजवर शेकडो वन्यजीव प्राणी मृत्यूमुखी पडल्याच्या नोंदी आहेत. यासंदर्भात अनके उपाययोजना करण्यात आल्याचा दावा सरकारद्वारे केला जातो. मात्र, महामार्ग ओलांडताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाघाचा व्हिडिओ पाहून शासनाच्या उपाययोजना कागदावरच आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग पेंच आणि कान्हान या वन्यप्राणांच्या कॉरिडॉरमधून जातो. या रस्त्याचा विस्तार करताना आवश्यक त्या ठिकाणी वन्यप्राणांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश हायकोर्टाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले होते. मात्र, वाघाच्या व्हिडिओतून वन्यप्राण्यांना जाण्या-येण्यासाठी पुरेशा उपाययोजना न करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.