नागपूर - भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 500 फूट लांब तिरंगा घेऊन फेरी काढली. या फेरीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
नागपुरात झळकला 500 फुट लांब तिरंगा; भाजप युवा मोर्चाचा उपक्रम - देशभक्तीची भावना
देशभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. नागपुरातसुद्धा हा उत्साह जोरात असल्याचे पाहायला मिळाले. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 500 फुट तिरंग्याच्या माध्यमातून नागपुरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

500 फुट तिरंग्याच्या माध्यमातून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या नागपुरकरांना शुभेच्छा
नागपुरात झळकला 500 फुट लांब तिरंगा
देशभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. नागपुरातसुद्धा हा उत्साह जोरात असल्याचे पाहायला मिळाले. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 500 फूट लांब तिरंगा तयार करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ही फेरी राम नगर चौकापासून फुटाळा तलावापर्यंत काढण्यात आली. हा विशाल असा तिरंगा बघण्यासाठी लोकांनी सुद्धा गर्दी केली होती. प्रत्येकजण या तिरंग्याकडे कौतुकाने पाहत होता. लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि देशभक्तीची भावना पाहायला मिळत होती.
Last Updated : Aug 15, 2019, 5:08 PM IST