नागपूर - जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किल्ले कोलार नदीच्या घाटावर दशक्रिया कार्यक्रमासाठी गेलेले तीघे तरुण नदीत वाहून गेल्याचे घटना घडली आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
आकाश राजेंद्र राऊत (वय 25 वर्षे), सानु येरवडे (वय 20 वर्षे) आणि हर्षित यादवान (वय 20 वर्षे), असे वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. तिघेही अजनी पोलीस ठाण्यात हद्दीत राहणारे होते. आकाश राऊत या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले असून उर्वरित दोघांचा शोध एनडीआरएफ, नागपूर महानगर पालिकेचे पथक आणि पोलीस घेत आहेत.