महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

न्यायालयातील लिफ्टमध्ये १० जण अडकले, ३ महिला वकिलांचा समावेश

वीज खंडीत झाल्याने बंद पडलेल्या लिफ्ट मध्ये १० जण ४५ मिनिटे अटकडे. बंद लिफ्टमध्ये श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तीन वकीलांची प्रकृती बिघडली.

दवाखान्यात भरती करण्यात आलेल्या वकील

By

Published : Jun 11, 2019, 7:52 PM IST

नागपूर - जिल्हा न्यायालयातील लिफ्ट बंद पडल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. वीज खंडीत झाल्याने ही लिफ्ट बंद पडली आणि त्यात १० जण अडकले होते. १० जण अर्धा तास लिफ्टमध्ये अडकल्याने अनेकांना श्वास घ्यायला त्रास होत होता.

वीज पूरवठा खंडित झाल्याने घटलेल्या प्रसंगाची माहिती देतांना नितीन देशमुख


वीज पुरवठा सुरू होईपर्यंत ४५ मिनिटांचा कालावधी लोटला आणि बंद लिफ्टमधल्या तीन वकीलांची प्रकृती बिघडली. या घटनेत जिल्हा न्यायालयातील अॅड. शाहीन शहा, अॅड. सुधा सहारे आणि अॅड. आफरीन अजवर यांचा समावेश आहे.


या तिन्ही वकिलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिन्ही वकीलांची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा सत्र न्यायलयात अशा प्रकारच्या घटना घडणे या अयोग्य व्यवस्थापनाचे ज्वलंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details