नागपूर - जिल्ह्यात गेल्या 24 तासात तीन नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे, नागपुरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 139 वर पोहोचली आहे. नवीन आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. नागपुरातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने या रुग्णांना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
24 तासांत नागपुरात आढळले तीन रुग्ण, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 139 वर - चोवीस तासात नागपुरात आढळले 3 रुग्ण
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 3 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. नवीन आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 1 महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. नागपुरातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने या रुग्णांना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
चोवीस तासात नागपुरात आढळले 3 रुग्ण
जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 44 झाली आहे. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या दोन्ही भागातून दररोज कोरोना रुग्ण समोर येत आहेत. अशात प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून हजारो नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेले आहे. त्यामुळे, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे.
Last Updated : May 1, 2020, 11:51 AM IST