नागपूर - शहरात वेगवेगळ्या ठिकाणी १२ तासामध्ये ३ हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणखी चव्हाट्यावर आला आहे. विक्की डहाके, मोहम्मद असिफ शेख मोहम्मद सईद आणि ऋषि खोसला, अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
नागपुरात १२ तासात ३ हत्येच्या घटना, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर - कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
नागपुरात १२ तासात ३ हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निमार्ण झाला आहे.
पहिली घटना नंदनवन परिसरातील सेनापती नगरच्या मोकळ्यात जागेत घडली आहे. यामध्ये विक्की डहाके (वय २२)या तरुणाची अज्ञात आरोपीने हत्या केली आहे. तसेच दुसरी घटना नंदनवन परिसरातच घडलेली आहे. यामध्ये खरीबी येथील गरीब नवाज नगर येथे राहणाऱ्या मोहम्मद असिफ शेख मोहम्मद सईद यांच्या दुकानात जाऊन काही आरोपींनी त्याला मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, तिसरी घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. गोंडवाना चौक परिसरात ऋषि ब्रिज खोसला यांची अज्ञात आरोपींनी डोक्यात वार करून हत्या केली आहे. ऋषि खोसला हे व्यापारी आहेत.