महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नयोनिटल निमोनियामुळे तीन महिन्यांच्या बाळाला तीनवेळा हार्ट अटॅक, मेडिकलच्या डॉक्टरांनी दिले जीवनदान - नागपूर मेडिकल कॉलेजचे डॉक्टर

मुदतपूर्व (प्री-मॅच्युअर) जन्म झालेल्या तीन महिन्याच्या बाळाला तीनवेळा हृदयविकाराचे झटके आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करत त्या बाळाला नवजीवन प्रदान केले आहे.

तीन महिन्यांच्या बाळाला तीन वेळा हार्ट अटॅक
तीन महिन्यांच्या बाळाला तीन वेळा हार्ट अटॅक

By

Published : Jun 22, 2023, 4:35 PM IST

Updated : Jun 25, 2023, 11:02 AM IST

बाळाला नवजीवन प्रदान

नागपूर: मुदतपूर्व (प्री-मॅच्युअर) जन्म झालेल्या तीन महिन्याच्या बाळाला तीनवेळा हृदयविकाराचे झटके आले होते. बाळ वाचण्याची शक्यता कमी होती. परंतु वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करत त्या बाळाला नवजीवन प्रदान केले आहे. नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात हे बाळ दाखल होते.

७५ दिवस उपचार : दोन बाळांचा मुदतपूर्व (प्री-मॅच्युअर) जन्म झाला होता. या बाळांना नयोनिटल निमोनिय त्रास होता. त्यावर सुद्धा डॉक्टरांनी यशस्वीपणे उपचार केले आणि दोन्ही बाळांना वाचवले आहे. दरम्यान या दोन्ही बाळांना दुर्मिळ असा सायटोमेगॅलॉइरस संसर्गामुळे श्वसनाच्या त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान विषाणूजन्य न्यूमोनियामुळे बाळांच्या फुफ्फुसांना गंभीर संसर्ग झाला होता. यामुळे बाळांना दोन आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तब्बल ७५ दिवसांच्या उपचारानंतर दोन्ही बाळ सुदैवाने बाळ बरे झाले आहेत.

अल्ट्रासाऊंड उपकरणांचा फायदा :दोन्ही बाळ मुदतपूर्व (प्री-मॅच्युअर) जन्माला आलेल्या बाळांना जन्मजात सायटोमेगॅलॉइरस संसर्गामुळे श्वसनाच्या त्रास असू शकतो. किंवा जन्मानंतर हा संसर्ग होऊ शकतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अचूक निदान करत बाळाला जीवनदान दिले. दरम्यान अशा प्रकरणांत फुफ्फुसाच्या अल्ट्रासाऊंडच्या रिपोर्टवर पुढील उपचार अवलंबून असतात. सुदैवाने नागपूर हे राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालयांपैकी ज्या ठिकाणी लहान मुलांसाठी अल्ट्रासाऊंड उपकरणे उपलब्ध आहेत. त्याचा फायदा या बळावर उपचार करण्यासाठी झाला आहे.

दोन्ही बाळ बरे झाले :दोन्ही बाळ प्रिमेक्युअर असल्याने त्यांचे वजन अत्यंत कमी होते. दोन्ही बाळांचे वजन हे दीड किलोपेक्षा कमी होते. त्यांना जन्मजातच श्वास घेण्यात त्रास होत होता. या बाळांना सुरुवातीपासून ऑक्सिजन देण्यात आले होते. नयोनिटल निमोनिय (नवजात बाळाना होतो) त्यांच्या संपूर्ण इन्फेक्शन असल्याने दोन्ही बाळ आधी उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अँटिबायोटिक औषधांमुळे हळूहळू त्यांनी प्रतिसाद दिल्याने ते आज पूर्णपणे बरे झाले आहेत. ज्या बाळाला तीन महिन्यांत तीन हृदयविकाराचे झटके आले ते बाळ अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होते. तर दुसऱ्या बाळाला छोट व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. आता दोनही बाळ अगदी व्यवस्थित आईचे दूध पीत आहे. त्यामुळे दोन्ही बाळांचे वजन देखील वाढले आहे. बाळांची प्रकृती चांगली असल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अभिषेक यांनी दिली आहे.

नयोनिटल निमोनिय म्हणजे काय:नयोनिटल निमोनिय हा नवजात बाळांना होतो. विशेषतः जे मुदतपूर्व जन्माला येतात. त्यांच्या हृदयावर सुजन येते. फुफ्फुसमध्ये पाणी भरते. डोक्यात रक्तस्त्राव होतो. वयस्क व्यक्तींना होणार निमोनिय हा फुफ्फुसपुरता मर्यादित असतो. पण नयोनिटल निमोनिय हा लहान मुलांच्या संपूर्ण शरीरात पसरतो.

Last Updated : Jun 25, 2023, 11:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details