नागपूर - मौदा तालुक्यातील वढना गावातील कन्हान नदीत सहलीसाठी आलेले तिघे तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. प्रशांत पटेल, अभिषेक चव्हाण आणि हरिकृष्ण लांबाचीय असे नदीत बुडालेल्या तिघांची नावे आहेत. यापैकी प्रशांत पटेल यांच्या मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तर अभिषेक चव्हाण आणि हरिकृष्ण लांबाचीय यांचा शोध घेतला जातो आहे.
नागपूर शहरातील वर्धमान नगर येथील स्वामी नारायण मंदिर ट्रस्टच्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी हे मौदा तालुक्यातील वढना येथील गोशाळेत पिकनिक करिता गेले होते. त्यापैकी दहा तरुण हे कन्हान नदीच्या पात्रात पोहण्याकरिता गेले होते. यादरम्यान तिघे तरुण हे खोल पाण्यात गेल्यामुळे त्यांना बाहेर निघता आले नाही. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रशांत राजाभाई पटेल (२३) यांचा मृतदेह मिळाला शोधण्यात यश मिळाले आहे. तर अभिषेक जितेंद्रभाई चव्हाण (२१) ) हरिकृष्ण वालजीभाई लिंबाचिया (२८) यांचा शोध सुरू आहे.