नागपूर - विदर्भाच्या विकासासाठी उद्योगाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. अर्थमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग भंडारा-गोंदिया वाढवण्याची घोषणा केली आहे. या भागात जिथे उद्योग नाही त्या दुर्गम भागात ग्रामीण आधारित व्यवसाय, उद्योग निर्माण झाले तर याच फायदा शेतकरी आणि कृषी क्षेत्राला होईल. केवळ मोठ्या शहरात न जाता या जागेचा विचार करून उद्योगाचे विकेंद्रीकरण करण्याची अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ते हिंगणा एमआयडीसीत आयोजित खासदार औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
Nirin Gadkari Nagur : 'विदर्भात गारमेंट क्लस्टर उभारणारची गरज'; तीन दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन
नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरात तीन दिवसीय (12 ते 14 मार्च) खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. तीन दिवसीय महोत्सवात 75 स्टॉल्स लागले असून 25 च्यावर सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रमाची दालने आहेत. या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा विदर्भातील एमएसएमईकडून होण्यासाठी वेंडर्सची निर्मिती व उपलब्धता होण्यास हा महोत्सव उपयोगी ठरेल असे आयोजकांनी सांगितले.
राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाने ज्या औद्योगिक कंपन्यांनी उत्पादन थांबवले किंवा बंद असलेल्या खाली जागेत ज्यांना गुंतवणूक करायची त्यांना ती जागा द्यावीत. या जागेच्या विक्री संदर्भात एक धोरण एमआयडीसीने तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विदर्भात कापूस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे धागा बनवण्यापेक्षा कापड बनवण्याचे म्हणजेच गारमेंटचे क्लस्टर उभारण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचेही म्हणालेत. संत्रा, कापूस यावर प्रक्रिया तयार होणारे तंत्रज्ञान कौशल्य प्रशिक्षण देण्यात यावे असेही गडकरी यांनी सांगितले.
विदर्भात असणाऱ्या संरक्षण उत्पादक कंपन्यांनी वाहन उद्योगाला लागणारे सीएनजी सिलेंडर तसेच सेमी कंडक्टरची निर्मिती केल्यास देशामध्ये या सुट्या भागाचा तुटवडा भासणार नाही. मॅगनीज ओअर इंडिया लिमिटेडने - मॉईलने उत्पादन वाढवण्याची गरज असून देशाच्या गरजेनुसार मॅगनीजचे उत्पादन आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नमूद केले. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अधीन नागपूरच्या एमएसएमई विकास संस्था तसेच विदर्भातील विविध उद्योजक आणि उद्योग संघटनांच्या सहकार्याने नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरात तीन दिवसीय (12 ते 14 मार्च) खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. तीन दिवसीय महोत्सवात 75 स्टॉल्स लागले असून 25 च्यावर सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रमाची दालने आहेत. या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा विदर्भातील एमएसएमईकडून होण्यासाठी वेंडर्सची निर्मिती व उपलब्धता होण्यास हा महोत्सव उपयोगी ठरेल असे आयोजकांनी सांगितले.