महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुखद : सतरंजीपुरा भागात राहणारे पाच रुग्ण कोरोनामुक्त - नागपूर कोरोना अपडेट्स

प्रशासनाने सतरंजीपुरा भागातील १७०० नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेले आहे. त्यामुळे त्यापैकी आणखी कोरोनाबाधित रुग्णांची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे.

सुखद : सतरंजीपुरा भागात राहणारे पाच रुग्ण कोरोनामुक्त
सुखद : सतरंजीपुरा भागात राहणारे पाच रुग्ण कोरोनामुक्त

By

Published : May 9, 2020, 6:57 PM IST

नागपूर -शहरातील सर्वात मोठ्या कोरोना हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या सतरंजीपुरा परिसरात राहणाऱ्या पाच रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज त्या पाच रुग्णांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेयो येथून सुट्टी देण्यात आली आहे. त्यांना पुढील 14 दिवस घरीच क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

सध्या नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८० पर्यंत गेली असली तरी ७० रुग्णांना डिस्चार्जदेखील मिळालेला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या सतरंजीपुरा झोनमधील सतरंजीपुरा, शांतीनगर, कुंदनलाला गुप्ता नगर, दलालपुरा आणि इतवारी या भागात सुमारे ११० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी एकट्या सतरंजीपुरा भागातून ९९ रुग्ण पुढे आले आहेत. त्यापैकी २९ रुग्ण कोरोनामुक्तदेखील झाले आहेत. आज यामध्ये पाच बरे झालेल्या रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ३४ वर गेला आहे. प्रशासनाने सतरंजीपुरा भागातील १७०० नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेले आहे. त्यामुळे त्यापैकी आणखी कोरोनाबाधित रुग्णांची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details