नागपूर - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोनाबधितांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली असताना मंगळवारी तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता नागपूरात रुग्णालयातून सुट्टी मिळालेल्या रुग्णांची संख्या ११ झाली आहे.
आणखी तीन कोरोना रुग्णांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
नागपूर येथेही मंगळवारी कोरोनाच्या ३ रुग्णांना पूर्ण बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे नागपूरात पूर्णपणे बरे होऊन सुट्टी मिळालेल्या रुग्णांची संख्या ११ झाली आहे.
एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असतानाच दुसरीकडे काही रुग्ण बरे होण्याच्या दिलासादायक माहितीही पुढे येत आहे. नागपूर येथेही मंगळवारी कोरोनाच्या ३ रुग्णांना पूर्ण बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे नागपूरात पूर्णपणे बरे होऊन सुट्टी मिळालेल्या रुग्णांची संख्या ११ झाली आहे.
दिल्ली येथून परत आलेल्या व्यापाऱ्यामुळे त्याच्या कुटुंबातील तीन लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या संपर्कात आल्याने जरीपटका येथील एका व्यापाऱ्यासह आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली होती. या तिघांवर मेयो रुगणालायत उपचार करण्यात आले. या तिघांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर मंगळवारी त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. तर, सध्या नागपुरात 44 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.