महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओळखीचा फायदा घेत तरुणाला लुटणाऱ्या तरूणीसह तिघांना अटक - नागपूर पोलिस न्यूज

जुन्या ओळखीचा फायदा घेत एका तरुणीने तिच्या तीन साथीदारांसह एका तरुणाकडून पैसे उकळल्याची घटना घडली आहे. सदर तरुणाच्या तक्रारीवरून तरुणीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

three-boyd-along-with-a-girl-attested-in-honey-trap-case
three-boyd-along-with-a-girl-attested-in-honey-trap-case

By

Published : Oct 6, 2020, 10:31 PM IST

नागपूर - जुन्या ओळखीचा फायदा घेऊन एका तरुणाकडून तरुणीसह तिघांनी पैसे लुटण्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी तरुणाने पोलीस ठाणे गाठून आरोपींच्या विरोधात तक्रार केल्यानंतर तरुणीसह तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. केवल बुद्धदेव,सौरभ रायपूरे आणि शुभम बुरडकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

याबाबत संपूर्ण घटनाक्रम असा आहे की, शहरातील नंदनवन परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने जुनी ओळख असलेल्या युवकाला प्लॅन करून घरी बोलावले. तो घरी पोहचताच तिने त्याच्यासोबत सलगी करायला सुरुवात केली. त्यानंतर ठरल्या प्रमाणे तिचा पती आपल्या दोन मित्रांसोबत तिथे अचानक पोहचला,त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून त्या तरुणाचे अर्ध नग्न फोटो काढले. एवढेच नाही तर त्याला मारहाण देखील केली. सदर तरुणीने तिच्या नवऱ्यासमोर तक्रारदार तरुणावर बलात्काराचा आरोप केला त्याला तिने थेट पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिल्याने तो तरुण घाबरून गेला होता.

मात्र त्यानंतर त्या आरोपींचा खरा चेहरा त्याच्या पुढे आला होता. रागात असल्याचा आव आणणारे क्षणात सेटलमेंट करण्यासाठी तयार झाले. हे प्रकरण पोलिसात जाऊ द्यायचे नसेल तर एक लाख रुपये मोजावे लागतील अशी मागणी आरोपींनी त्या तरुणाकडे केली. त्यानंतर आरोपींनी त्याला चाकुचा धाक दाखवत एटीएममध्ये नेऊन 13 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी त्याला सोडून दिले.

दरम्यान, तरुणाने थेट नंदनवन पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तरुणीसह तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली असून चारही आरोपींना अटक केली आहे .

ABOUT THE AUTHOR

...view details