महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, मुख्य आरोपीसह तिघांना अटक - physical abuse

नागपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी तिघांना अटक
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी तिघांना अटक

By

Published : Jan 22, 2020, 6:24 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील कामठी येथील रणाळा मार्गावरील निर्जनस्थळी एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी मुख्य आरोपींसह तिघा आरोपींना अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी तिघांना अटक

कळमना वसाहतीत राहणारी १६ वर्षीय मुलगी ही मित्रासह रणाळा-भिलगाव येथील पांधन रस्त्यावरील असलेल्या निर्जन स्थळावर फिरायला गेली होती. त्याचवेळी तिथे आलेल्या ३ आरोपींनी एकांताचा फायदा घेत पीडित मुलीचा पाठलाग सुरू केला. आरोपींनी पीडितेसह तिच्या मित्राला पकडून बेदम मारहाण केली, त्यानंतर त्यातील एका आरोपीने मुलीला मैदानातील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला.

हेही वाचा - उपराजधानीत मनसे करणार पक्षाचा विस्तार! महाधिवेशनाकडे लक्ष

घटनेनंतर आरोपींनी घटना स्थळावरून पळ काढला. पीडितेने मित्रासह नवीन कामठी पोलीस ठाणे गाठून घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार गुन्ह्यातील तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. रस्त्यावर अंधाराचा फायदा घेत लुटमार करत असल्याचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

हेही वाचा -मुंढेची नियुक्ती भाजपच्या गडावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न?

ABOUT THE AUTHOR

...view details