नागपूर - नागपूर पोलिसांना दुपारी एकच्या सुमारास नागपूर पोलिसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी देणारा निनावी फोन आला. त्या फोन कॉलमध्ये संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पोलिसांना दुपारी निनावी फोन आला होता. त्यामध्ये संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली. मात्र ही धमकी कुणी दिली ते अजूनही स्पष्ट झाले नाही.पोलिसांनी याबाबतची चौकशी सुरू केली आहे. धमकीची फोन आल्यानंतर नागपूर पोलीस सतर्क झाले आहेत. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला निनावी फोन आला होता.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा सध्या सीआयसएफकडे आहे. त्याचबरोबर संघ मुख्यालयाच्या बाहेर नागपूर पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात येते. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी यामध्ये वाढ केली आहे. तसेच फोन करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.
नागपूरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयाल उडवून देण्याची यापूर्वीही अनेकदा धमकी मिळालेली आहे. पोलिसांनी आणि सुरक्षा दलांनी त्याबाबत वेळोवेळी कारवाईही केली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याने सीआयएसएफकडून मुख्यालयाला सुरक्षा देण्यात आली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी देणारा निनावी फोन आल्याने मात्र पोलीस सतर्क झाले आहेत. नेमका फोन कुणी केला त्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.