महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीतून हजारो पक्षी आणि प्राणी जप्त

सूत्रांच्या माहितीनुसार कोलकात्याच्या हावडा ते मुंबई पर्यंत धावणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीत हजारो पक्षी आणि प्राणी भरून असलेले पिंजरे ठेवले जात असल्याचा प्रकार एका प्रवाशाच्या लक्षात आला. गाडी फलाटावर येताच कारवाई करत पार्सल बोगीतून पक्षी आणि प्राणी असलेले ८ पिंजरे उतरवण्यात आले.

By

Published : Apr 24, 2019, 11:45 AM IST

ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीतून हजारो पक्षी आणि प्राणी जप्त

नागपूर - रेल्वे लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नागपूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीतून हजारो पक्षी आणि प्राणी जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेले पक्षी कोलकाता येथून मुंबईला नेण्यात येत होते. एका जागरूक प्रवाशाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने याची तक्रार केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या मंत्रालयाकडे केल्यानंतर जीआरपीएफ आणि आरपीएफने तात्काळ कारवाई करत करत सर्व पक्षी आणि प्राणी आपल्या ताब्यात घेतले आहेत.

ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीतून हजारो पक्षी आणि प्राणी जप्त

सूत्रांच्या माहितीनुसार कोलकात्याच्या हावडा ते मुंबई पर्यंत धावणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीत हजारो पक्षी आणि प्राणी भरून असलेले पिंजरे ठेवले जात असल्याचा प्रकार एका प्रवाशाच्या लक्षात आला. आल्यानंतर त्याने सुरवातीला याची माहिती केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या मंत्रालयाला दिली. यानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत नागपुरातील अंजली वैजार यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट जीआरपीएफ पोलीस स्टेशन गाठले, कारवाई करता आरपीएफला सुद्धा सोबत घेण्यात आले होते. ज्ञानेश्वरी एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वीच आरपीएफ आणि जीआरपीएफ चे पथक तैनात करण्यात आले होते. गाडी फलाटावर येताच पार्सल बोगीतून पक्षी आणि प्राणी असलेले ८ पिंजरे उतरवण्यात आले. यातील १०० पेक्षा जास्त पक्षांचा गर्मी मुळे मृत्यू झाला होता. जप्त करण्यात आलेले सर्व पक्षी वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले असून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details