नागपूर : मोबाइलवर खेळल्या जाणाऱ्या पब्जी या ऑनलाइन खेळामुळे आत्महत्येचे सत्र वाढले आहे. याच पब्जीमुळे नागपुरातील एका १३ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केलीची धक्कादायक घटना गिट्टीखदान परिसरात घडली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलाने नवीन आयपॅड घेऊन दिले होते. मात्र मोबाईल गेमच्या नादात मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. राजवीर नरेंद्र ठाकूर असे मृत मुलाचे नाव आहे. तो सातव्या वर्गात शिकत होता.
'पब्जी'चा नाद उठला जीवावर; स्टंट करताना १३ वर्षीय मुलाने गमावला जीव, नागपूरमधील घटना - pubg game nagpur news
पब्जी या ऑनलाईन खेळात पुढील पातळी गाठण्यासाठी देण्यात आलेले आव्हान पूर्ण करताना १३ मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना गिट्टीखदान परिसरात उघडकीस आली आहे. राजवीर नरेंद्र ठाकूर असे मृत मुलाचे नाव आहे. तो सातव्या वर्गात शिकत होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरू आहे. त्यामुळे मुलांना मोबाईल, आयपॅड घेऊन दिल्या जात आहे. परंतु, या उपकरणांचा अति वापर मुलांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या राजवीला दैनंदिन अभ्यास करत असताना पब्जीचा छंद लागला. त्याचे वडील नरेंद्र ठाकूर हे नागपूर गुन्हे शाखेच्या वाहनचोरी प्रतिबंधक पथकात कार्यरत आहेत. अभ्यासात हुशार असणारा राजवीर काही दिवसापासून पब्जीच्या आहारी गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याने पब्जीमधील स्टंट करण्यासाठी स्वतःच्या खोलीतील खिडकीला ओढणी बांधून त्याचा गळफास गळ्यात घातला. सोबतच त्याने ऊशीचे कव्हरही आपल्या चेहऱ्यावर घेतले. राजवीरच्या आत्महत्येमुळे आई-वडील व भावंड स्तब्ध झाले आहेत.
सर्वांसोबत चांगला वागणारा, अत्यंत हूशार असणारा राजवीर असे पाऊल उचलेल असे कोणालाही वाटले नव्हते, अशा प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागपुरात अशा घटना दररोज घटत आहेत. मुलांना मोबाईल आणि पब्जी सारख्या खेळाचे लागलेले हे व्यसन जीवघेणे ठरत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.