नागपूर-जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी दिवसभरात १३ कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला झाला आहे, यामध्ये एका भिक्षेकरी व्यक्तीचा समावेश आहे. १३ कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या ५१४ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
नागपुरात एका दिवसात वाढले १३ कोरोनाबाधित; २ रुग्णांचा मृत्यू - नागपूर लेटेस्ट न्यूज
नागपूरमध्ये १३ कोरोनाबाधितांची वाढ झाल्याने रुग्णसंख्या ५१४ वर पोहोचली आहे. ३८० रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भानखेडा येथील 6, सतरंजीपुरा परिसरातले 2 असून तांडापेठ येथील 1, एसआरपीएफ कॅम्प मधील 1 जवान आहे. 2 रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील आहेत. नरखेड तालुक्यातील मन्नाथखेडी गावातील हे दोघे एका आठवड्यापूर्वी मुंबईतून गावात परतले होते. त्यामुळे मुंबई मधून परतणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाची एन्ट्री होत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथे देखील आज एकजण कोरोनाबाधित रुग्ण समोर आला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ४ दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका भिक्षेकऱ्याचा व एका 74 वर्षीय गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. तर 380 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे,त्यामुळे आता नागपूरात १२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.