नागपूर-जिल्ह्यात सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५५३ झाली आहे. १३ रुग्ण वाढल्याने नवीन कंटेंनमेंट झोनची देखील वाढवण्यात आले आहेत.
नागपूरमध्ये सोमवारी १३ कोरोना रुग्णांची भर; एकूण संख्या ५५३ वर - nagpur corona cases today
नागपूर जिल्ह्यात 13 कोरोनाबाधित रुग्ण वाढल्यामुळे एकूण रुग्ण संख्या 553 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 391 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नागपूर कोरोना अपडेट
पाच दिवसांपासून नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाचे १९ रुग्ण वाढले होते. सध्या १५० रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत ३९१ रुग्णांनी कोरोना वर यशस्वी मात केली आहे. दिवसभरात कोरोनामुक्त संख्येचा आकडा चारशेच्या पुढे जाऊ शकतो. या शिवाय आतापर्यंत ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे