नागपूर - जिल्ह्यातील धापेवाड्यात गॅस वेल्डरचा वापर करत बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडल्याची घटना पुढे आली आहे. चोरट्यांकडून अत्यंत युक्तीशीरपणे हे एटीएम फोडून १० लाखांची रोखड लंपास केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या परिसरात नेहमी वर्दळ असल्याने घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागपुरात एटीएम फोडून १० लाखांची रोकड लंपास - नागपूर लेटेस्ट न्यूज
नागपुरातील कळमेश्वर ते सावनेर मार्गावर धापेवाडा येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएमच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांनी एटीएम फोडून रोकड लंपास केली. ग्रामस्थ सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले असता एटीएम फोडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
नागपुरातील कळमेश्वर ते सावनेर मार्गावर धापेवाडा येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएमच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांनी एटीएम फोडून रोकड लंपास केली. ग्रामस्थ सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले असता एटीएम फोडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. विशेष म्हणजे हे एटीएम बसस्थानक परिसरात असल्याने या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. अशातच चोरट्यांनी हे एटीएम फोडलेच कसे? असा सवालही स्थानिकांकडून उपस्थित केल्या जात आहे. दरम्यान, या घटेनेचा तपास सावनेर पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती सावनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे. तसेच या घटनेचा तपास युद्धपातळी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.