महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीसीटीव्ही : 'कॅमोऱ्या'ची दिशा बदलून केली चोरी, दुसऱ्या 'कॅमेऱ्या'त झाले चोरटे कैद - चोरटे

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराफ दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून चोरट्यांनी दुकानात चोरी केली. पण, दुकानातील कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले

सीसीटीव्हीत कैद चोरटे
सीसीटीव्हीत कैद चोरटे

By

Published : Jan 19, 2020, 5:35 PM IST

नागपूर- शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारदा नगर येथील एका सराफ घुसून चोरट्यांनी लाखोंच्या मुद्देमालावर हात साफ केला. चोरी करण्यापूर्वी आरोपींनी सीसीटीव्हीची दिशा बदलवण्याचा प्रयत्न केला असला तरी ते दोन्ही चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सीसीटीव्ही व माहिती देताना पोलीस अधिकारी

नागपूरच्या हडकेश्वर भागातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत शारदा नगरमध्ये दिलीप केशवराव बांगारे यांच्या मालकीचे गुरु माऊली नामक सोनाराच दुकान आहे. या दुकानाचे शटर दोन अज्ञात चोरट्याने उचकटले होते. दुकानाचे शटर उचकटण्यापूर्वी दोन्ही चोरट्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर रुमाल बांधून दुकानात प्रवेश केला. त्यावेळी आपण सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी तेथून पळून जाण्याऐवजी सीसीटीव्हीची दिशा वळवली. यानंतर चोरट्यानी दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेले नगदी 50 हजार रुपये आणि 4 लाख 43 हजार 302 रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details