महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खळबळजनक..! सावनेरमध्ये चोरट्यांनी पळवले एटीएम मशीन - इंडियन ओव्हरसीज बँके एटीएम चोरी

महामार्गालगत असलेल्या खापा टी पॉईंटजवळ सूतगिरणीच्या भिंतीला लागून इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम आहे.या एटीएम कक्षातील मशीनच चोरट्यांनी लंपास केली.

चोरट्यांनी एटीएमच पळवले
चोरट्यांनी एटीएमच पळवले

By

Published : Dec 7, 2019, 11:46 AM IST

नागपूर - चोरट्यांनी एटीएमच पळवून नेल्याची घटना सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी-खापा टी पॉईंटवर घडली. शुक्रवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एटीएममध्ये 2 लाख 83 हजार 600 रुपयांची रोकड होती.

एटीएम पळवून नेल्यानंतर रिकामा एटीएम कक्ष

हेही वाचा - महिलेला पोलिसांचा धक्कादायक सल्ला; ‘तो’ पुन्हा तुमच्याकडे आल्यावर बोलवा! मग कारवाई करू

महामार्गालगत असलेल्या खापा टी पॉईंटजवळ सूतगिरणीच्या भिंतीला लागून इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम आहे. या एटीएम कक्षातील मशीनच चोरट्यांनी लंपास केली. स्थानिक पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details