नागपूर - टोल नाक्यावर लोकांच्या रांगा न लागता सिमलेस ट्राफिक राहावे, कुठेही थांबण्याची गरज पडू नये यासाठी वाहनावर फास्टटॅग लावून घ्यावे. टोल नाक्याच्या बाजूला फास्टटॅग लावण्याची व्यवस्था केली आहे, ही शेवटची संधी आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
अनेक मार्गावर 70 ते 80 टक्के वाहनधारकांनी फास्टटॅग वाहनावर लावून घेतले आहे. काही मार्गावर हे प्रमाण 90 टक्के आहे. आता केवळ 10 टक्के लोक राहिले आहे. दोन तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. यामुळे आता पुन्हा मुदतवाढ देणार नाही. त्यामुळे राहिलेल्या वाहनधारकांनी लवकरात लवकर फस्टटॅग लावून घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून तयार केला जातो सीएनजी
वेगवेगळ्या माध्यमातून सीएनजी तयार होतो, धानाचे तनस, पराट्या, तुराट्या, ज्वारीचे व सोयाबीनचे कुटार यापासून सीएनजी मिळतो. तसेच साखर कारखाण्यात तयार होणाऱ्या मिथेनपासून देखील 18 टन सीएनजीची निर्मिती होते. सीएनजी मिळवण्याचा तीसरा पर्याय म्हणजे ऑरगॅनिक वेस्ट यापासून मिथेनची निर्मिती केली जाते आणि त्यापासून सीएनजीची निर्मिती केली जाते.
पूर्व विदर्भात पेट्रोल डिझेल विरहीत वाहने धावणार