नागपूर - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर झाले आहे. लॉकडाऊनमध्ये केंद्र आणि राज्य शासनाने झोन निहाय काही शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नागपूर शहर हे ‘रेड झोन’मध्ये असल्याकारणाने येथे कुठलीही शिथिलता राहणार नसल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती होत्या, त्याच कायम राहतील. यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत.
"लॉकडाऊनमध्ये नागपुरात कुठलीही शिथिलता नाही, दारू दुकाने उघडणार नाहीत" - nagpur covid 19
नागपूर शहर हे ‘रेड झोन’मध्ये असल्याकारणाने येथे कुठलीही शिथिलता राहणार नसल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती होत्या, त्याच कायम राहतील. यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत.
त्यानुसार सरकारी आस्थापना किंवा खासगी कार्यालयांना ३० टक्के कर्मचारी संख्या ठेवून कार्य सुरू करण्यास नागपुरात पुढील आदेशापर्यंत बंदी कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वाईन शॉप किंवा अन्य कुठलीही दुकाने नागपूर महानगरपालिका हद्दीत सुरू होणार नाहीत, असे आदेशात नमूद केले आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबई, पुणे शहरासाठी जे नियम लागू आहेत तेच नियम नागपूर शहरासाठी लागू राहतील. त्यामुळे नागरिकांनी कुठलाही संभ्रम ठेवू नये, असेही मुंढेही म्हणाले.