महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Murder Case : दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या

हुडकेश्वर परिसरात गाडीचा कट लागल्याने वाद आणि हाणामरी झाली. या हाणामारीत तिघांनी एकाचा खीन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली ( Hudkeshwar police arrested three accused ) आहे.

Jitendra Chopade
जितेंद्र चोपडे

By

Published : Jan 9, 2022, 10:01 AM IST

नागपूर:नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक ( Incidents of Hudkeshwar Police Station ) घटना घडली आहे. अतिशय शुल्लक कारणातून उद्भवलेल्या वादात तिघांनी मिळून एका तरुणाचा निर्घृण खून केला आहे. या घटनेत जितेंद्र चोपडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव ( Jitendra Chopade was killed )आहे. दुचाकीचा कट लागला अशा शुल्लक कारणावरून नागपुरात जितेंद्रची हत्या झाल्याचं निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

हुडकेश्वर परिसरातील जितेंद्र चोपडे हत्या प्रकरण

घटना अशी की, जितेंद्र चोपडे हा त्याचा मित्र प्रकाश तिवारी सोबत एका हॉटेलमधून जेवण करून घरी परत येत होता. येत असताना जुना नाका परिसरात त्याच्या दुचाकीला विजय उग्रेचा या आरोपीच्या दुचाकीचा कट लागला. यावरून दोघांमध्ये अगोदर शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा शाब्दिक वाद इतका चिघळला की, तो वाद हाणामारी पर्यंत गेला. हाणामारीत विजय उग्रेचाने त्याचे दोन भाऊ रोहित आणि रवी उग्रेचा यांच्या मदतीने चाकूने वार करून जितेंद्रची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी विजय, रोहित आणि रवी उग्रेचा या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

नागरिकांमध्ये तीव्र संताप -

जितेंद्र चोपडेच्या हत्येनंतर हुडकेश्वर परिसरात या घटनेबाबत नागरिकांचा (Anger in Hudkeshwar after murder of Jitendra Chopade ) रोष उफाळून आला. काही नागरिकांनी जितेंद्र चोपडे याचा मृतदेह थेट हुडकेश्वर पोलीस स्टेशन ( Hudkeshwar Police Station ) समोर आणला होता. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असली, तरी इतर दोन आरोपींना पोलिसांनी सोडून दिल्याचा आरोप नागरिकांनी केला. दरम्यान पोलिसांनी नागरिकांची समजूत घातल्यानंतर परिसरातील नागरिकांनी जितेंद्र चोपडेचे अंत्यसंस्कार केले.

ABOUT THE AUTHOR

...view details