महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

FILM Kashmir Files: आपण जे भोगले त्याच्या जखमा ताज्या आहेत, त्यामुळे चित्रपट पाहण्याची हिंमत होत नाही

काश्मीर फाईल्स या चित्रपटाची (FILM Kashmir Files) चर्चा देशभर आहे. काश्मीरी नागरिकांनी मात्र आपण जे भोगले त्याच्या जखमा ताज्या आहेत (The wounds of what we suffered are fresh) त्यामुळे चित्रपट पाहण्याची हिंमत होत नाही ( so we don't have the courage to watch movies) अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चित्रपटामुळे सत्य बाहेर आल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे.

काश्मिरी पंडितांच्या भावना

By

Published : Mar 18, 2022, 12:43 PM IST

Updated : Mar 18, 2022, 1:19 PM IST

नागपूर:जे आम्ही भोगलेलं आहे, त्याचे घाव आजही ताजे आहेत, (The wounds of what we suffered are fresh) त्यामुळे हा चित्रपट बघण्याची आमच्यात हिम्मत शिल्लक नसल्याचे (so we don't have the courage to watch movies) मत काश्मीरचे विस्तापित व्यक्त करत आहेत, काश्मीर फाईल्स चित्रपट बघितला तर ते घाव आणखी ताजे होतील म्हणून आम्ही अजून तरी चित्रपट बघितला नसल्याचे ते सांगतात. 1990 च्या दशकात काश्मिरी नागरिकांवर अमानवीय अत्याचार सुरू झाले होते. डोळ्यासमोर अनेकांचा जीव घेतला जात होता, तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने आम्हाला काश्मीर सारखे नंदनवन सोडावे लागल्याचे दुःख कायम असल्याचे ते सांगतात.

काश्मिरी पंडितांच्या भावना
काश्मिरी फाईल्सच्या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही जे सहन केले होते ते जगासमोर आलेले आहे. यापूर्वी आम्ही जेव्हा सांगायचो की आमच्यावर किती अत्याचार झाले आहेत त्यावर कुणाला विश्वास बसत नव्हता मात्र आता चित्रपट आल्यानंतर लोकांना आमच्या वेदनांची जाणीव होत आहे.

ज्यावेळी काश्मिरी हिंदूवर अत्याचार होत होते तेव्हा आमच्या बाजूने कुणीही उभे नव्हते, रोज नवी यादी जाहीर व्हायची,ज्यात अनेकांचे नावे असायची. ज्यांचे नाव जाहीर केले त्यांना तात्काळ काश्मीर सोडण्यास भाग पडले जात होते. ज्यांनी विरोध केला त्यांना मारले जात होते, ते सगळं आठवले की आजही अंगावर काटा उभा राहतो अशी भावना डॉ गंजू यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : The Kashmir Files : राजीव गांधी काश्मिरी पंडितांच्या बाजूने अन् भाजप रथयात्रेत व्यस्त; काँग्रेसचा घणाघात

Last Updated : Mar 18, 2022, 1:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details