महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' वाघाची तब्बल 10 किलो वजनाची हाडे जप्त, आरोपींची संख्या 11 वर - वाघाची शिकार करून अवयवांची तस्करी

वनविभागाच्या विशेष पथकाने यवतमाळमधील वाघाच्या शिकार प्रकरणात 7 आरोपींना अटक केल्यानंतर चौकशी आणखी चौघांना अटक करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून शिकारीनंतर जंगलात लपवून ठेवलेले 10 किलो 300 ग्रॅम वजनाची वाघांची हाडे आणि अवयव जप्त करण्यात आली आहेत.

tiger's bones seized
tiger's bones seized

By

Published : Oct 18, 2021, 10:18 PM IST

Updated : Oct 18, 2021, 10:29 PM IST

नागपूर -वनविभागाच्या विशेष पथकाने यवतमाळमधील वाघाच्या शिकार प्रकरणात 7 आरोपींना अटक केल्यानंतर चौकशी आणखी चौघांना अटक करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून शिकारीनंतर जंगलात लपवून ठेवलेले 10 किलो 300 ग्रॅम वजनाची वाघांची हाडे आणि अवयव जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या किटा खापरी गावातील चौघांना अटक करण्यात आली आहे.

यवतमाळ तालुक्याच्या कीटा खापरी भागात मार्च 2018 मध्ये एक वाघाची शिकार करण्यात आली. यात वाघाची शिकार करून त्याचे अवयव प्रकरण शांत झाल्यानंतर किमान दोन-तीन वर्षांनी विकण्याचा बेत शिकरींचा होता. तोच बेत साध्य करण्यासाठी वाघाच्या अवयव विक्रीस काढले असताना वन विभागाच्या विशेष पथकाला माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे वन उप वनसंरक्षक डॉ.भरत सिंग हाडा यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख नरेंद्र चांदेवर यांनी सापळा लावून नागपूर हळदगाव वर्धा मार्गावर सात जणांना अटक केली. यात सात जणांना ताब्यात घेऊन तपास सुरू करण्यात आला.

माहिती देताना वनअधिकारी
सात जणांकडून खोटी माहिती -

सुरुवातीला सात जणांना अटक करण्यात आली तेव्हा यातील मुख्य सूत्रधार यांनी वन विभागाला खोटी माहिती दिली. यात मुख्य आरोपी वाघाची शिकार केल्यानंतर त्या व्यक्तीने फाशी घेऊन मरण पावला. यामुळे आमचा काही दोष नाही, असे तो भासवत होता. पण वन विभागाला त्याचा संशय असल्याने त्या नावाचा कोणताच मृत व्यक्ती नव्हता असे पोलिसांकडून समजले. तसेच वाघाची शिकार उमरडा भागात झाल्याची खोटी माहिती दिली.

वाघांची हाडे जप्त
वन विभागाने चौकशी दरम्यान वाघाच्या अवयवांचे काय केले याची माहिती घेत घटनास्थळ गाठले. आरोपीने किटा खापरी परिसरातील जंगलात जिथे सहसा कोणी जात नाही अशा ठिकाणी वाघाची शिकार करून त्याच भागात त्या वाघाचे अवयव जमिनीत पुरवल्याची माहिती दिली. यात वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक 469 मधून शिकार केलेल्या वाघाची हाडे हे जमिनीतून बाहेर काढून जप्त केली. यावेळी तब्बल 10 किलो 300 ग्रॅम वजनाचे हाडे जप्त करण्यात आले.

हे ही वाचा -अहो आश्चर्यम!... महिलेने दिला एकाच वेळी तब्बल ७ मुलांना जन्म



पाच जणांनी मिळून केली वाघाची शिकार -

या प्रकरणात आरोपी हे जंगल भागात पाळीव प्राणी चराईसाठी नेत असल्याने त्यांना या वाघाबद्दल माहिती मिळाली असावी, असा संशय आहे. पाच जणांना यात वाघाची शिकार केली. त्यानंतर काही अवयव हे आपापसात वाटून घेतले. यात प्राण्यांचे अवयव औषधी बनवण्यासाठी वापरत असून ते अवयव जवळ ठेवत इतर अवयव जमिनीत पुरले. शिकार करणारे 5 आरोपी असून इतर 7 आरोपी हे अवयव विक्रीच्या अनुषंगाने यात गुंतले आहेत. आतापर्यंत 11 आरोपींना या प्रकरणात अटक झाली असून पुढील तपासात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एका वाघ दंतापासून प्रकरणाचे घबाड फुटले -

यात गुप्त माहितीच्या आधारे सुरवातीला एका वाघाचा दात मिळाला आणि त्यापासून ही करवाई सुरू झाली. त्यात वाघाचे हाड, ज्यामध्ये वाघ नखे आणि शरीरातील इतर हाडे जप्त केली. संतोष पांडुरंग कुंभेकर, लक्ष्मण मोतीराम कवाने, सतीश देवराव डुकरे, विनोद मारोती देवकर या चौघांना अटक केली. सदर कार्यवाई मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार, नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. सिंह हाडा, यवतमाळचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख नरेंद्रजी. चांदेवार, रामटेक साह्यक वनसंरक्षक संदीप गिरी, बुट्टीबोरीं वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही. ठोकळ, यवतमाळ अनंता दिघोडे, वनक्षेत्रपाल अमर सिडाम, नेहारे, शेंडे, जाधव, मुंडे, धुर्वे, कुलरकर, पडवळ सर्व वनरक्षक यांनी धाड यशस्वी धाड पार पाडली.

Last Updated : Oct 18, 2021, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details