नागपूर:हा प्रकार नरखेड तालुक्यातील एका गावात घडला मात्र प्रेमी युगुलांचे शाररीक संबंधांचे घटनास्थळ नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (MIDC Police Station) हद्दीत असल्याने हे प्रकरण एमआयडीसी पोलिसांना वर्ग करण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी तरुणी तिच्या प्रियकराच्या खोलीवर राहण्यासाठी आली होती, त्यावेळी दोघांमध्ये शारीरिक संबंध आल्याने मुलगी गर्भवती झाली. पोटात मूल वाढत असल्याच्या कल्पनेने ती हादरून गेली होती. या संदर्भात तिने तिच्या प्रियकराला सांगितले तेव्हा त्याने गर्भपात करण्यासाठी काही औषधे तिला दिले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
Aborted After Watching Video : युट्यूब वर व्हिडीओ पाहून अल्पवयीन तरूणीने केले स्वतःचे अबॉर्शन - MIDC Police Station
प्रेम संबंधातून झालेली गर्भधारणा कुटुंबापासून लपवण्यासाठी एका अल्पवयीन तरुणीने चक्क युट्युब वर व्हिडिओ बघून (watching a video on YouTube) स्वतःचाच गर्भपात केल्याची (The teenager had her own abortion ) अतिशय धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील नारखेड तालुक्यात घडली आहे. सुदैवाने तरुणीच्या तब्येतीत सुधारणा होत असून सध्या तिच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्यामुळे घाबरलेल्या मुलीने युट्यूबवर गर्भपात करणारे व्हिडीओ बघायला सुरुवात केली. त्यातील एका व्हिडीओ मध्ये सांगितल्या प्रमाणे औषध तयार करून ते प्राशन केल्यानंतर तिचा गर्भपात झाला मात्र त्या मुलीची तब्येत बिघडल्याने सर्व हकीकत तिच्या आईला समजली, त्यानंतर तिच्या आईने मुलीला लागलीच रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत. सध्या मुलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची तब्येत धोक्याबाहेर असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील पीडित तरुणी ही 17 वर्षांची तर मुलाचे वय 27 आहे. मुलगा सज्ञान असल्याने त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.